पासपोर्ट (Passport) अर्थात पारपत्र म्हणजे आपल्या देशातून
बाहेर अन्य कुठल्याही देशात जाण्यासाठी सरकारकडून (Government) मिळालेली रीतसर परवानगी.
ती काही अटींवर मिळत असते. यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याकडे
अर्ज (Application) करावा लागतो. कोणत्याही भारतीय नागरिकास (Indian citizens) पासपोर्ट मिळतो
पासपोर्टसाठीचा अर्ज पोस्टात (India post) किंवा पारपत्र ऑफिसात (Passport Office) केवळ दहा रुपयांना
मिळतो. यात सर्व आवश्यक ती माहिती दिलेली असते.
अर्ज भरताना
- काळ्या शाईने भरावा.
- अर्ज कॅपिटल आणि सुवाच्च अक्षरात लिहावा.
- अर्जातील सर्व स्पेलिंग कागदपत्रां प्रमाणे हवे.
- सर्व अर्ज पूर्ण भरून पारपत्र कार्यालयात दोन प्रतीत सादर करून त्याची पावती घ्यावी.
- ही पावती पारपत्र घरी येईपर्यंत जपून ठेवावी. या पावतीवरील नंबरप्रमाणेच पुढील सर्व व्यवहार होतात.
पासपोर्ट मिळण्यासाठी साधारण ४५ दिवस लागतात. तर तात्काळ पासपोर्ट सात दिवसात मिळतो. नागपुरात कोराडी मार्गावर मानकापूर येथे पासपोर्ट सेवा केंद्र आहे.
हे सुद्धा वाचा : घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स
ऑनलाइन पर्याय....
- सर्वप्रथम पासपोर्ट सेवा पोर्टलवर https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink भेट द्या.
- त्यानंतर New User Registration वर क्लिक करा.
- तुमच्या समोर नोंदणी फॉर्म ओपन होईल. त्यात विचारलेली माहिती भरून नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर व्हेरिफिकेशनसाठी एक लिंक येईल. त्यावर क्लिक करून व्हेरिफाय करावे.
- त्यांनतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- Apply for Fresh Passport/Re-issue of Passport वर क्लिक करा.
- त्यानंतर Click here to fill the application form online वर क्लिक करा.
- पुढे आपले राज्य आणि जिल्ह्याची निवड करा.
- नंतर तुम्हाला विचारलेली माहिती अचूकरीत्या भरा.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रात वेळ निश्चित
करण्यासाठी (अपॉइंटमेंट) 'पे अँड शेड्युल अपॉइंटमेंट' बटनवर क्लिक करा.
- पासपोर्ट सेवा केंद्राची वेळ घेतल्यानंतर डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून किंवा बँकेच्या चालानद्वारे शुल्क भरा.
- यूजर रेफरन्स नंबर किंवा अपॉइंटमेंट नंबर असलेल्या पावतीची प्रिंट काढू शकता.
- मूळ कागदपत्रांसह पासपोर्ट सेवा केंद्रावर जन्मतारखेचा पुरावा,
छायाचित्रासह ओळख पुरावा, राहण्याचा पुरावा आणि राष्ट्रीयतेचा पुरावा यासह
भेट द्या.
हे सुद्धा वाचा : घरबसल्या नोंदवा मतदारयादीत आपले नाव
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साइज फोटोग्राफच्या चार प्रती
- रेशनकार्ड, छायाचित्र असलेले ओळखपत्र (निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
- जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (तीन झेरॉक्स प्रती)
- लग्न झाले असल्यास महिलांच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट आणि जर लग्नात नाव बदलले असल्यास पासपोर्टच्या अर्जात दिलेल्या प्रमाणे प्रतिज्ञापत्र भरून द्यावे.
हे सुद्धा वाचा : ऑनलाइन रेशन कार्ड कसं पाहायचं?
पोलीस चौकशी
पासपोर्टसाठी अर्ज जमा केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे पोलीस चौकशी. अर्ज जमा केल्यानंतर हा अर्ज साधारण १५ दिवसापर्यंत आपल्या भागातल्या स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी येतो. पोलीस चौकशीच्या वेळेस पुन्हा सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति आणि दोन फोटो द्यावे लागतात. इथेही एक अर्ज भरावा लागतो. सर्व प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक द्यावी. साधारण आठ ते दहा दिवसांत अर्ज पोलिसांच्या शिफारशीने पासपोर्ट कार्यालयात परत जातो. पोलिसांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर पासपोर्ट पोस्टाने घरी येतो. पासपोर्ट घरी आल्यानंतर सर्व नीट तपासून पाहावे. काही चुका असल्यास ताबडतोब पासपोर्ट कार्यालयाला कालवावे. नाहीतर प्रवास करताना या चुकांचा त्रास होऊ शकतो.
1 Comments
thunder titanium lights - TITNIA GRAPHIC ARTIC
ReplyDeletethunder titanium vs stainless steel titanium lights Thunder in the center is a burnt titanium new way to explore the titanium knife world's most spectacular landscape camillus titanium and spectacular titanium nose stud setting.