वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. हायटेक काळात हा परवाना प्राप्त करणे सहज शक्य असूनही अनेक जण दलालांचा आधार घेतात. त्यामुळे दलालांकडे न जाता https://sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर घरबसल्या वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज ( Online Application) करणे शक्य आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे ही एक सोपी प्रक्रिया (Easy Presses) आहे. जर आपणास रस्त्यावर दुचाकी (Two Wheeler) किंवा चारचाकी वाहन (four Wheelers) चालवायचे असेल तर वाहन परवाना सोबत बाळगावाच लागतो. वाहन चालवण्याचा सराव करीत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला वाहन चालविणे शिकत असल्याचा परवाना (लर्निंग लायनन्स) काढावा लागतो. यासाठी वाहतुकीच्या नियमांवर (Traffic Rule) आधारीत ऑनलाइन परीक्षाही (Online Exam) द्यावी लागते. (Get a Learning License Online at Home)
कुठूनही देऊ शकता परीक्षा
आता घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना प्राप्त होऊ शकतो. यासाठी लागणारी ऑनलाइन परीक्षा कुठूनही देता येणे शक्य आहे. चाचणी देण्यासाठी रस्ता सुरक्षाविषयक (Road Safety Video) व्हिडीओ पाहणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी आपला आधार क्रमांक (Adhar Card) मोबाइल क्रमांकाशी लिंक (Mobile Link) असणे आवश्यक आहे.
- वर दिलेल्या संकेतस्थळावर शिकाऊ परवान्यासाठी अर्ज भरताना आधार कार्डचा पर्याय निवडू शकता.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर लिंक असलेल्या मोबाइलवर ओटीपी प्राप्त होतो.
- ओटीपी टाकल्यानंतर अर्जदाराचे छायाचित्र, जन्मतारीख व पत्ता आधार डेटा बेसमधून ऑनलाइन अर्जामध्ये येतो.
- त्यानंतर कोणता परवाना हवा हा पर्याय निवडावा.
- स्वतःची स्वाक्षरी करून नमुना (अ) अपलोड करावा लागेल.
पूर्वीप्रमाणे आता चाचणी देण्यासाठी अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. चाचणीतील ६० टक्के प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्यानंतर शिकाऊ परवाना प्राप्त होता.
आवश्यक कागदपत्रे :- वयाचा दाखला : जन्म प्रमाणपत्र, हायस्कूल/दहावीचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र, पॅनकार्ड, सीजीएचएस कार्ड किंवा जन्मतारखेचे प्रतिज्ञापत्र
ओळख पुरावा :- पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड इ.
पासपोर्ट आकाराची चार रंगीत छायाचित्रे
असा करा ऑनलाइन अर्ज
- https://sarathi.pariva-han.gov.in/sarathis-ervice/stateSelection.do या संकेतस्थळावर वाहन परवान्यासाठी अर्ज करता येतो.
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर राज्य आणि शहराची निवड करा.
- त्यानंतर 'अप्लाय ड्रायव्हिंग लायसन्स' या पर्यायावर क्लिक करून 'न्यू ड्रायव्हिंग लायसन्स' या पर्यायावर क्लिक करा.
- अर्जात विचारलेली माहिती अचूकपणे भरा.
- यासाठी लागणारे शुल्क डेबिट कार्डच्या माध्यमातून भरू शकता.
- अर्ज पूर्ण भरल्यानंतर अर्ज क्रमांक काळजीपूर्वक लिहून ठेवा.
पक्क्या परवान्यासाठी (Permanent License)
- शिकाऊ परवाना काढल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पक्का परवाना काढता येतो.
- दुचाकी किंवा चारचाकी अशा ज्या वाहनासाठी अर्ज केला आहे ते वाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरात चालवून दाखवावे लागते.
- संबंधीत वाहनाची कागदपत्रे परिपूर्ण असावीत.
- वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत वाहन चालविणे आवश्यक आहे.
- दुचाकीस्वारास हेल्मेट आवश्यक आहे.
- ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर काही दिवसांच्या आत परवाना घरच्या पत्त्यावर प्राप्त होतो.
0 Comments