लोकशाही (Democracy) मजबूत करायची असेल तर मतदान प्रक्रियेत (Voting process) नागरिकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकांसाठी (upcoming Election) मतदार नोंदणी कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. मतदार यादीत नाव तपासणी किंवा नाव नोंदविण्याची प्रक्रिया आता एका क्लिकवर उपलब्ध असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याची गरज आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे कामही सुरू आहे. निवडणूक शाखेने मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून 9 ऑगस्ट पासून सुरू झालेली ही प्रक्रिया 31 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. आता मतदार यादीत आपले नाव ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे शक्य आहे. (Register your name in the voter list at home)
अशी आहे प्रक्रिया...
- सर्वप्रथम https://www.nvsp.in/ या संकेत स्थळावर जा.
- Login/Registration या बटणवर क्लिक करा.
- त्यानंतर Register as New User वर क्लिक करून आपल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी द्वारे नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचं आहे. (लॉगिन आयडी नोंदणी करताना टाकलेला तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी टाकावा)
- लॉगिन केल्यांनतर डाव्या बाजूला असलेल्या Fresh Inclusion/Enrollment या बटनावर क्लिक करा.
- यानंतर सिटीजनशिप आणि आपल्या राज्याची निवड करा.
- पुढे आपल्याला वोटिंग कार्ड नोंदणीसाठी फॉर्म खुलेल.
- त्यात संपूर्ण माहिती अचूक भरावी.
- राज्य, जिल्हा, विधानसभा, लोकसभा मतदारसंघ यानुसार क्लिक करा.
- संपूर्ण अर्ज भरुन आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- भरलेला अर्ज पुन्हा तपासा आणि सबमिट करा.
असे शोधा आपले मतदार यादीत नाव
https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या लिंक वरील इलेक्ट्रॉल सर्च इंजिनवर क्लिक करा. नावानुसार आणि आयडीकार्ड नुसार येथे नाव तपासता येईल. नावानुसार तपासायचे असल्यास त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिलेले आहेत. विधानसभा मतदारसंघनुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्च वर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.
ऑनलाइनचा पर्याय...
30 ऑक्टोंबर पर्यंत आलेल्या अर्जाचा विचार करून 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन पर्यायही उपलब्ध आहे. www.nvsp.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरता येईल.
हे सुद्धा वाचा : शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात झाले तीन मोठे बदल
अर्ज भरताना चूक नको...!
- अर्जामध्ये संपूर्ण नोंदी कराव्यात.
- विधानसभा क्षेत्रानुसार आपला विधानसभा मतदारसंघ निवडावा.
- पत्ता अचूक टाका.
- कुटुंबातील किंवा शेजारच्या व्यक्तींचा मतदार ओळखपत्र क्रमांक लिहावा.
- छायाचित्र अपलोड करताना चेहरा स्पष्ट दिसेल याची काळजी घ्या.
- फाईल अटॅच करताना ते दोन एमबी पेक्षा जास्त नको.
- जेपीजी, पीएनजी, बीएमपी, जेपीईजी, डीपीआय 200 फोटो साईज १२८० x १०२४ सेंटी मीटर असावी.
- ऍड्रेस प्रूफ : इलेक्ट्रिक बिल आधार कार्ड इत्यादी.
- जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत स्पष्ट दिसेल अशी असावी.
- अर्जदाराने अर्जात अपंगत्व असल्याचा उल्लेख करावा.
मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात 6 नंबरचा अर्ज भरून नाव नोंदविता येते.
0 Comments