About Me

header ads

ऑनलाईन रेशन कार्ड कसं पाहायचं?

केंद्र शासनाच्या (Central Government) किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत गरीबांना केंद्रस्थानी मानून दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना (Families below the poverty line) सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात दिनांक १ जून, १९९७ पासून सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरुवातीला गरीब कुटूंबांना प्रति कुटूंब दरमहा 10 किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध करुन दिले जात होते. दिनांक 1 फेब्रुवारी, 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची (National Food Security Act) अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस पुर्वीप्रमाणेच प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते. (How to view ration card online?)

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राज्यासाठी सुरुवातीस केंद्र शासनाने ६०.३४ लक्ष एवढी बीपीएल लाभार्थ्यांची (BPL Beneficiaries ) कुटुंब संख्या (इष्टांक) निश्चित केली होती. त्यानंतर सन 2000 च्या राज्याच्या लोकसंख्येवर (State Population) आधारित राज्याकरीता पूर्वीच्या इष्टांकांत वाढ करुन ६५.३४ लक्ष एवढी दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांची कुटूंब संख्या (इष्टांक) निश्चित केली आहे.

हे सुद्धा वाचा : शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमात झाले तीन मोठे बदल

तर आपले हे रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसे शोधायचे याबद्दल आपण पाहणार आहोत. (how to search ration card Number online)

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी 

  • सगळ्यात आधी www.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection)
  • या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रेजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी तुम्हाला सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत.
  • त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय असतील, एक म्हणजे नोंदणीकृत युझर आणि दुसरा नवीन युझर. तर आपण पहिल्यांदाच या साईटवर येत असल्यानं आपल्याला नवीन युझर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं Do you have ration card आणि No ration card असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. यातल्या No ration card या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचं स्थानिक भाषेतलं नाव, ते तुम्ही मराठीत लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आधारवर जे नाव आहे आणि ते जसं आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे मेल आयडी असेल तर तो लिहायचा आहे, त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाकायची आहे. नंतर लिंग निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे.

ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आधार कार्ड व्हेरिफाय झाल्यानंतर पुढे तुमचा जिल्हा, गावाचं नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.

हे सुद्धा वाचा : भारत जगातील सर्वात तरुण देश

रेशन कार्ड ऑनलाईन कसं पाहायचं?

एकदा का तुम्हाला तुमचा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.

  • त्यासाठी www.rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.
  • त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे.
  • यावर क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसंच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं, याची माहिती दिलेली असते.

Post a Comment

0 Comments