About Me

header ads

मुक्ताई धबधबा : एक मनमोहक ठिकाण

मुक्ताई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी 

विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पासून २० किलोमीटर अंतरावर असलेलं 'मुक्ताई' वाघाईच्या डोंगरावर असून हे माना समाजाचं जागृत देवस्थान आहे. येथे मुक्ताबाई मंदिर आणि जवळच ५५ फुटांवरून कोसळणारा धबधबा आकर्षणाचा केंद्र आहे. घनदाट जंगल आणि खडकाळ वाट काढून जंगलाच्या मध्यभागी निसर्गरम्य वातावरणात मुक्ताई धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. खासकरून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

यंदा हा धबधबा पर्यटकांविनाच कोसळत आहे

यंदा (२०२१) गतवर्षीपेक्षा लवकर पाऊस पडल्याने जून महिन्यातच पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव आणि कोविड-१९ ची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शासनाने निर्बंध लावले. आणि पर्यटकांसाठी पुन्हा एकदा मुक्ताई धबधबा बंद केला. त्यामुळे यंदा हा धबधबा पर्यटकांविनाच कोसळत आहे. 

मुक्ताई येथील निसर्गरम्य परिसरात, पक्ष्यांची किलबिल, धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि येथील मोठं-मोठे खडक आणि पहाडी भाग मन मोहून टाकणारा आहे. 

धबधब्यासमोर तयार झालेलं इंद्रधनुष्य (सौजन्य : मी स्वतः)

धबधब्यावर सूर्याचे किरण पडल्यावर तयार होणारे इंद्रधनुष्य आणखीनच आनंद देतात. धबधब्याला लागूनच एक नागमोडी गुहा असून ती धबधब्यापासून वरती डोंगरावर जाते.

मी माझ्या परिवारासोबत

पावसाळ्यात या निसर्गरम्य परिसरात असलेल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मुक्ताई धबधब्याला अवश्य भेट द्या.  

कसं जायचं?

  • चिमूर ते डोमा अशी एसटी सेवा सकाळी आणि सायंकाळी आहे. 
  • चिमूर-कांपा मार्गावरून किटाळी व कवडशी येथूनही डोमा येथे जाता येते. तेथून मुक्ताबाई पर्यटनस्थळी जाता येते. 
  • नागपूरकडून येणाऱ्या पर्यटकांना उमरेड मार्गे चिमूर-डोमा. 
  • चंद्रपूर मार्गाने येणाऱ्या पर्यटकांना वरोरा मार्गे चिमूर-डोमा. 
  • भंडारा-गोंदिया मार्गाने येणाऱ्यांना कांपा ते चिमूर मार्गावरील किटाळी व कवडशी मार्गे डोमा जाता येते. 
  • तसेच वर्धा मार्गे येणाऱ्यांना नांदोरी मार्गे खडसंगी-चिमूर-डोमा जाता येते.





Post a Comment

0 Comments