१४ ऑगस्ट : घटना (14 August Dinvishesh)
१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला (chakan fort) ताब्यात घेतला.
१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना. (Kolkata HighCourt)
१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. (Bombay HighCourt)
१८९३: मोटर वाहनांची नोंदणी (Vehicle Registration) सुरू करणारा फ्रान्स (France) हा पहिला देश.
१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने (Japan) शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
१९४३: नागपूर विद्यापीठाने (Nagpur University) स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantyavir Vinayak Damodhar Sawarkar) यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
१९४७: पाकिस्तानला (Pakistan) युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
१९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
२०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
१४ ऑगस्ट : जन्म
१७७७: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८५१)
१९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)
१९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.
१९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी (Jayavant Dalavi) यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)
१९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.
१९६२: पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक रमीझ राजा यांचा जन्म.
१९६८: क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचा जन्म.
१४ ऑगस्ट : मृत्यू
१९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००)
१९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२६)
१९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)
२०११: हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)
२०१२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे निधन. (जन्म: २६ मे १९४५)
0 Comments