About Me

header ads

आता घरबसल्या काढा सातबारा

डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होईल वापर  

महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) महसूल विभागाने (Revenu Department) सात-बारा उताऱ्यात प्रमुख ११ बदल केले आहेत. जवळपास ५० वर्षानंतर हे बदल करण्यात आले आहेत. हा नवीन स्वरूपातला सात-बारा उतारा १ ऑगस्ट २०२१ या महसूलदिनापासून (Revenue Day) सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाइन (Online) पद्धतीने तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा (Digital Sign 7/12) घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा (Government scheme) लाभ घेण्यासाठी वापरताही येतो. यावर स्पष्ट नमूद असते की, 'हा सात बारा डिजिटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही स्वाक्षरी शिक्क्याची गरज नाही.' (Digital 7/12)
 

अशी आहे प्रक्रिया

  • या संकेतस्थळाच्या उजवीकडे 'डिजिटल साइन्ड ७/१२' किंवा 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा' पाहण्यासाठी इथं क्लिक करा हा पर्याय दिसेल.
  • यावर तुम्ही क्लिक केल्यास 'आपला ७/१२' नावाचे एक नवीन पेज ओपन होईल.
  • तुम्ही जर आधीच या वेबसाइटवर नोंदणी केली असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साइटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • पहिल्यांदाच नवीन सात-बारा काढायचा असेल तर मोबाइल क्रमांक वापरून सातबारा काढता येतो. यासाठी ओटीपी बेस्ड लॉगिन वर क्लिक करायचे आहे.
  • मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर 'सेंड ओटीपी' या पर्यायावर क्लिक करा. 
  • ओटीपी टाकल्यानंतर सात-बारा नावाने एक नवीन पेज ओपन होईल, यावर 'डिजिटल साइन्ड सात-बारा' यासह इतर पर्यायही दिसतील.
  • त्यानंतर 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा' असे शीर्षक असलेले पेज ओपन होईल. सात-बाऱ्यासाठी १५ रुपये शुल्क घेतले जाईल.
  • डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा मिळवण्यासाठी अर्जात दिलेली माहिती पूर्ण भरावी लागेल.
  • यात जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर सर्वे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी 'डाउनलोड' पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर डाउनलोड झालेला सात-बारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. 
  1. सात-बाऱ्यावर सुरुवातीला 'गाव नमुना ७' आणि खाली 'गाव नमुना १२' असतो.
  2. 'गाव नमुना ७' मध्ये भोगवटादार रकान्यात शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेले असते. 
  3. यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितले असते. तर उजव्या बाजूला इतर अधिकारातील माहिती नमूद असते. (Download Facility for Digitally signed 7/12, 8A and Property Card)
 

Post a Comment

0 Comments