About Me

header ads

मीराबाई चानूने संपविली २१ वर्षांची प्रतीक्षा


मीराबाई चानूने (Mirabai Chanu) ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Olympic weightlifting competition) पदकाची २१ वर्षांची प्रतीक्षा संपविली आणि ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver medal) जिंकले आहे. जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) दुसर्‍या दिवशी भारताच्या २६ वर्षीय मीराबाई चानूने देशासाठी पहिले पदक जिंकले आहे. भारोत्तोलनामध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.

एवढेच नाही तर मीराबाईने क्लीन अँड जर्क (Clean and jurk) प्रकारात वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा बनविला आहे. यामुळेच या ऑलिम्पिक मध्ये मीराबाईकडून भारताला (india) जास्त आशा होती आणि मीराबाई भारतीयांच्या आशेवर खरी उतरली आहे. चला तर जाणून घेऊया मीराबाई यांच्या आयुष्यातील काही न ऐकलेले किस्से...


मीराबाई चानूचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी इम्फाल येथून २० किलोमीटर दूर असलेल्या Nongok Kakching नावाच्या गावात झाला. ती ६ भाऊ-बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मीरा ही आपल्या भावासोबत पहाडांवर लाकडं जमा करायला जायची. जे लाकडाचे बंडल मीराचा भाऊ उचलू शकत नव्हता ते बंडल मीरा सहज उचलून दोन किमी अंतरावरून घरी आणत असे. त्यामुळे मीरा १२ वर्षाची असतानाच तिच्या कुटुंबाने तिचे सामर्थ्य ओळखले होते. 

मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या. त्यांचा आदर्श मीराबाईंनी घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईंनी वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला.

रिओमध्ये अयशस्वी कामगिरी
वयाच्या २१ व्या वर्षी, एन कुंजारानी देवी (N Kunjarani Devi सोबत १९२ किलो वजन उचलत १९० किलो वजन उचलण्याचा विक्रम मोडल्यानंतर मीरा रिओ २०१६ मध्ये गेली परंतु तेथे तिला यश आले नाही. तिने रिओ ऑलिम्पिक स्नॅच (Rio Olympic snatch) स्पर्धेत ८२ किलो वजन उचलून तिसरे स्थान मिळवले परंतु क्लीन अँड जर्क मध्ये पहिल्या प्रयत्नात ती १०३ किलो वजन उचलू शकली नाही.


मात्र उत्तम कामगिरी सुरू ठेवली
मीराला रिओ ऑलिम्पिकमध्ये यश मिळालं नाही, परंतु तिने आपली उत्तम कामगिरी सुरूच ठेवली. ताशकंद येथे झालेल्या आशियाई चँपियनशिपमध्ये
 (Asian Championships) मिराने ११९ किलो वजन उचलत सर्वांना आश्चर्यचकित केले. स्नॅचमध्ये ८६ किलो वजन उचलण्यात ती यशस्वी झाली. अशा प्रकारे तिने एकूण २०७ किलो वजन उचलले. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आणि तेव्हापासून ती सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे.

जिंकलेली पदके
मीराने २०१४ कॉमनवेल्थ गेम्स, ग्लासगो येथे महिलांच्या ४८ किलो वजन गटात रौप्य पदक जिंकले. गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या २०१८ च्या आवृत्तीत तिने सुवर्णपदकाच्या दिशेने जाणाऱ्या खेळांचे रेकॉर्ड तोडले. सर्वात मोठी कामगिरी अशी की, २०१७ मध्ये अमेरिकेच्या अनाहेम येथे झालेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.


पद्मश्री आणि अनेक खेळांनी सन्मानित
१०१४ पासून ४८ किलो वजन गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नियमित भाग घेत मीराने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विश्व चॅम्पियनशीप आणि अनेक पदके जिंकली आहेत. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल मीराबाईला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने (Padmshree Award) सन्मानित केले. 


तसेच १०१८ मध्ये मीराला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khelratn Purskar) प्रदान करण्यात आला.


म्हणून हा खास पदक
ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनामध्ये भारताला मिळालेले हे दुसरे पदक आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील मीराचे पदकही विशेष आहे कारण त्यांनी भारोत्तोलनात २१ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारोत्तोलनामध्ये भारताकडे सध्या एकच पदक आहे, जे २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीने जिंकले. देशासाठी वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू होती. तेव्हा तिने कांस्यपदक जिंकले होते.
मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की जिद्द असेल तर कोणीही त्यांना हवं ते ध्येय साध्य करू शकतो..!

Post a Comment

0 Comments