UGC NET 2021 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून (NTA) UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे (corona) डिसेंबर 2020 सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात आणि जून 2021 च्या अर्जाच्या प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी घेण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
डिसेंबर 2020 सत्र परीक्षा आणि जून 2021 सत्र परीक्षा एकत्र केली गेली आहे. आता दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. इच्छुक उमेदवार www.ugcnet.nta.nic.in आणि www.nta.ac.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 सप्टेंबर 2021
फी भरण्याची अंतिम तारीख : 6 सप्टेंबर 2021
अर्जात सुधारणा करण्याचा कालावधी : 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर
यापूर्वी डिसेंबर 2020 सत्राची UGC NET परीक्षा 2 मे ते 17 मे 2021 दरम्यान होणार होती. UGC NET डिसेंबर 2020 साठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये आयोजित केली गेली. असे उमेदवार ज्यांनी UGC NET डिसेंबर 2020 परीक्षेसाठी नोंदणी केली आहे परंतु अर्ज पूर्णपणे सादर करू शकले नाहीत ते https://ugcnet.nta.nic.in, www.nta.ac.in ला भेट देऊन अर्ज पूर्ण करू शकतात.
या कालावधीत होणार परीक्षा
- 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल.
- पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल.
- ही परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल.
- या परीक्षेत दोन पेपर असतील. दोन्ही पेपरमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन (Multiple Choice Question) असतील.
(UGC NET Exam 2021 date)
0 Comments