About Me

header ads

८०६ रिक्त पदांसाठी MPSCची संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा (Exam) येत्या ४ सप्टेंबरला २०२० (4 September 2021) होणार आहे. आधी ही परीक्षा ११ एप्रिल २०११ रोजी होणार होती. मात्र, कोरोनाच्या (Covis-19) पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती.


८०६ जागांच्या भरतीसाठी (Recruitment) ही परीक्षा आहे. कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोग वेळोवेळी आढावा घेईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले.

आता आंदोलन घेणार मागे संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख (Exam date) जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच येत्या सोमवारपासून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आता हे आंदोलन मागे घेणार असल्याचे एमपीएससी स्टुडंट्स राईटसचे महेश बडे यांनी सांगितले. (combain pre-examination of MPSC for 806 vacancies on 4th September)

Post a Comment

0 Comments