About Me

header ads

टीईटी परीक्षा २०२१ चे स्वरूप आणि पात्रता, ३ ऑगस्ट पासून करा अर्ज

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२१’ (TET) घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर (maharashtra state council of examination) सोपविली आहे. ही परीक्षा १० ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी येत्या मंगळवारपासून (ता. ३ ऑगस्ट) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित-विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

TET म्हणजे (Teachers Eligibility Test) :
शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांची परिपूर्णता करणारा शिक्षक (Teacher) कोणत्या पात्रतेचा असावा याबाबत स्पष्टीकरण देणारी टीईटी (TET) ही संकल्पना आहे.

शिक्षक होण्याच्या मूलभूत ज्ञानासोबत किमान पात्रता असावी अशी अट नवीन शिक्षणाच्या कायद्यानुसार घालण्यात आली. शिक्षणाचा मूलभूत अधिकार २००९ हा नवीन कायदा करून शिक्षणाचे महत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य करण्यात आले.

महाराष्ट्राच्या संदर्भाने टीईटी परीक्षा २०१३ मध्ये सुरु करण्यात आली. यासाठी आधारभूत ‘शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा २००९’ / बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ हा कायदा आहे.
प्राथमिक वर्गासाठी इयत्ता पहिली ते सातवीसाठी शिक्षकांची व्यवसायिक पात्रता बारावी आणि अध्यापक शिक्षण पदविका D.T.ed. अशी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षकांना व्यवसायिक पात्रता सोबत शिक्षक पात्रता धारण करणे आवश्यक आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा tet दोन प्रकारच्या घेण्यात येतात

पहिली ते पाचवीसाठी शिक्षक पात्रता TET – १

१) दोन वर्षांची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका

२) शिक्षक पात्रता परीक्षा -राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण

सहावी ते आठवीसाठी शिक्षक पात्रता TET – २

१) मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची पदवी आणि शिक्षणशास्त्र पदविका.

२) शिक्षक पात्रता परीक्षा - राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) maha tet मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील.

maha tet परीक्षेसाठी पात्रता गुण
टीईटी परीक्षा मध्ये ६० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना पात्र असे समजण्यात येईल. आरक्षित प्रवर्गासाठी पात्रता गुण मर्यादा ५५ टक्के इतके राहील.

खाजगी शाळांमध्ये जर आपण काम करत असू तर अशा प्रकारे आपल्याला टीईटी देणे अनिवार्य आहे का?

- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ हा पूर्ण देशभर लागू आहे आणि ८६वी घटनादुरुस्ती २००२ नुसार मूलभूत अधिकारांमध्ये याचा समावेश असल्यामुळे खाजगी, विनाअनुदानित, अनुदानित, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व प्रशासनाच्या शाळांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी पात्र असणे अनिवार्य आहे.

टीईटी परीक्षा maha tet वर्षातून किती वेळा होते? (maha tet exam २०२१)

टीईटी परीक्षा वर्षातून एकदा होत असते. tet परीक्षेसाठी अर्ज करत असताना पेपर एक किंवा पेपर दोन किंवा पेपर १ व २ साठी अर्ज करता येतो. अर्ज करत असताना आवेदन शुल्क मात्र दोन्ही पेपर देणार असाल तर दोन्ही पेपराचे भरावे लागेल.

शिक्षक पात्रता परीक्षेची कालमर्यादा

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणारा उमेदवार शिक्षक होण्यासाठी पात्र म्हणून प्रमाणपत्र देण्यात येते. उत्तीर्ण असणारा उमेदवार पुढील सात वर्षापर्यंत त्याच्या पत्र तिची कालमर्यादा पूर्वी ठरवण्यात आलेली होती. शिक्षक पात्रता परीक्षेतील अद्ययावत बदलानुसार पात्रतेची सात वर्षाची मर्यादा रद्द करून एकदा शिक्षक पात्रता उत्तीर्ण होणारा विद्यार्थी कायमचा शिक्षक होण्यासाठी पात्र म्हणून ठरविण्यात येईल. पहा अधिक माहिती व्हिडीओ द्वारे click here

टीईटी परीक्षेसाठी कोण पात्र आहे?

डी. एड, बी. एड अशा शिक्षण शास्त्र विषयांशी संबंधित पदवी व पदविका धारण करणारा प्रत्येक विद्यार्थी किंवा उमेदवार टीईटी परीक्षेसाठी पात्र आहे.

टीईटीचे वेळापत्रक
  • ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : ३ ते २५ ऑगस्ट
  • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - एक : १० ऑक्टोबर (वेळ- सकाळी साडेदहा ते दुपारी एक)
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - दोन : १० ऑक्टोबर (वेळ - दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार)
पपाठ्यक्रम (अभ्यासक्रम)

पेपर-१
इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

२) गणित :-
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

३) परिसर अभ्यास :-
परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

पेपर २ - इ. ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक स्तर

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

२ अ) गणित व विज्ञान विषय गट :-
गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

२ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-
सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. (Form and eligibility for TET exam 2021, apply from 3rd August)

Post a Comment

0 Comments