अणुबॉम्बचा वापर करू नका सांगणारा दिवस !
हिरोशिमाच्या (Hiroshima) जमिनीवरून आज आकाश जितके स्वच्छ दिसते, तितकेच ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेच्या (America) एनोला गे (Enola gay) नावच्या बी-२९ प्रकारच्या विमानाने (B-19) 'लिट्ल बॉय' (little boy) असे नामकरण केलेला परमाणूबॉम्ब (Atomic Bomb) हिरोशिमा बंदर शहरातील (Hiroahima City) लष्करी तळांना लक्ष्य करून टाकला होता. त्यात हिरोशिमा नष्ट झाल. या हल्ल्यात १ लाख ४० हजार लोक मारले गेले आणि आकाश काळ्या रंगाच्या प्रचंड धुराने व बॉम्बच्या भडक्याने काळेभोर झाले होते.
या बॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी 'हिरोशिमा दिवस' (Hiroahima Day) म्हणून अनेक देशातील लाखो लोक जागवितात. "हिरोशिमा पुन्हा नाही" असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात.
६ ऑगस्ट १९४५ हा मानवाच्या इतिहासातील (Human History) अतिशय दुर्देवी दिवस. मित्र राष्ट्रांनी जपानमधील (Japan) एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून साऱ्या जगाला स्तब्ध केले. या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, ३ लाख वस्तीचे हे शहर नष्ट झाले.
एका बॉम्बने मनाची शांती झाली नाही म्हणून ९ ऑगस्टला दुसरा बॉम्ब "नागासाकी" शहरावर टाकत प्रचंड विध्वंस केला. नागासाकी शहरावर हेच अस्मानी संकट कोसळले. नागासाकीमध्ये (Nagasaki) ३५ हजारांच्या आसपास लोक लगेच मरण पावले; परंतु स्फोट, उष्णता किंवा रेडिएशनमुळे मरण पावलेल्यांची संख्या अचूकपणे कळलीच नाही.
विज्ञानानेच मानवाच्या आत्मविश्वासावर केलेला तो मोठा हल्ला होता. मानवाच्या क्रुरतेपुढे मानवाच्या साहस व शौर्याला पराजय पत्करावा लागला. जपानने या बॉम्ब हल्ल्यानंतर सपशेल शरणागती पत्करली.
दोन्ही शहरातील हसती, खेळती घरे, गजबजलेले रस्ते, चिवचिवणाऱ्या शाळा नेस्तनाबूत झाल्या. माणसाने वसवलेल्या संस्कृतीची स्फोटाने राखरांगोळी करत सगळे सजीव निर्जीव आपल्या पोटात घेतले. दोन्ही शहरांना स्मशानाची कळा आली.
दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील बहुतेक लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व इतर आजार यामुळे मृत्यू पावले.
हिरोशिमात अधिक संख्येने मिलिटरीचे लोक लष्करांच्या शिबंदीमध्ये राहात होते. २ सप्टेंबर १९४५ रोजी जपानने बिनशर्त शरणागती पत्करल्यावर दुसरे महायुद्ध संपले.
त्यानंतर जपानी सरकारने लगेचच वाचलेल्या लोकांसाठी मदत कार्य सुरू केले. कालांतराने सरकारच्या मदतीने दोन्ही शहरांचे पुनर्निर्माणाचे काम सुरु करण्यात आले. अथक आणि अविश्रांत प्रयत्नानंतर तिथे पुन्हा जनजीवन फुलविले गेले. पुनर्बांधणी करताना नागरिकांच्या मतांना विचारात घेण्यात आले. हिरोशिमामध्ये आता विमानतळ, हायवे आणि ट्रेनसेवा सुद्धा आहे.
0 Comments