घटना
१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला. १७९९ : रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
१९२० : पनामा कालव्याचे औपचारिक उद्घाटन झाले.
१९३५ : प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९६१ : पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.
१९६२ : लंडनमधील माक्र्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.
१९७९ : किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची ( NABARD ) स्थापना झाली.
१९८५ : पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.
१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९८ : १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
१९९९ : महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.
२००१ : कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.
जन्म
ख्रिस्त पूर्व १०० : रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.
१८१७ : अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्री थोरो यांचा जन्म. (मृत्यू : ६ मे १८६२)
१८५२ : अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो ग्रिगोयेन यांचा जन्म. १८५४ : संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म. (मृत्यू : १४ मार्च १९३२)
१८६४ : अमेरिकन वनस्पतीतज्ञ , शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू : ५ जानेवारी १९४३)
१९०९ : प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म. (मृत्यू : ८ जानेवारी १९६६)
१९१३ : इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म. (मृत्यू : १४ जून २०१०)
१९२० : सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा जन्म. (मृत्यू : १४ जुलै २००८)
१९४७ : भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती यांचा जन्म.
१९६१ : भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.
१९६५ : क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.
मृत्यू
१६६० : बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.
१९१० : रॉल्स - रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन. (जन्म : २७ ऑगस्ट १८७७)
१९४९ : आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन.
१९९४ : हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे निधन.
१९९९ : हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म : २० जुलै १९२९)
२०१२ : मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म : १९ नोव्हेंबर १९२८) २०१३ : चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन. (जन्म : १२ फेब्रुवारी १९२०)
२०१३ : बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस यांचे निधन. (जन्म : २ नोव्हेंबर १९२९)
0 Comments