निळू फुले यांचा आज (१३ जुलै) स्मृतिदिन (Actor Nilu Phule's Memorial Day today (July 13))
डोक्यावर पांढरी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरत बेरकीपणानं हुंकारत आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांवर कायमस्वरूपी ठसा उमटविणारे नायक आणि खलनायकाच्या भूमिकेत आपली कारकीर्द गाजविणारे निळू फुले (Nilu Fule) यांचा आज (१३ जुलै) स्मृतिदिन.
"बाई वाड्यावर या..." या डायलॉग साठी निळू फुले जास्तच फेमस झाले. पण मुळात निळू फुलेंची ही ओळख नाहीच परंतु आता हीच त्यांची ओळख बनलेली आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील (Marathi Film Industry) मोठा अभिनेता (Actor) म्हणून निळू फुलेंची ओळख होती. असही म्हटलं जात होतं की, त्यांच्याशिवाय कुठलाही मराठी चित्रपट बनूच शकत नव्हतं. कारण निळू फुले म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील अमिताभ बच्चनच! (Amitabh Bachhan)
पु.ल. देशपांडे (P.L.Deshpande) यांच्या नाटकात 'रोंगे'च्या भूमिकेतून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. निळू फुलेंना मराठी तसेच इतर विविध बोलीभाषेचे विलक्षण ज्ञान होते. 'कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'सखाराम बाईंडर' या नाटकातून त्यांच्या बोलीभाषेची प्रचिती लक्षात येते. आणि याच वागनाट्यातील उत्कृष्ठ भूमिकेतून खऱ्या अर्थाने एक कलाकार म्हणून ते पुढे आले. अभिनयाच्या जोरावर निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.
निळू फुलेंनी मराठी चित्रपट सृष्टीत नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. मात्र खलनायकाच्या भूमिकेसाठी ते जास्त प्रसिद्ध झाले. एवढंच नव्हे तर काही महिला त्यांच्या नावाने बोटे मोडायची. अशी खरी खुरी खलनायकाची भूमिका ते साकारत होते. निळू फुलेंचे ग्रामीण आणि शहरी निरीक्षण अतिशय अचूक होते. आणि याच निरीक्षणाचा उपयोग त्यांनी आपल्या अभिनयात करून घेतला.
निळू फुले यांनी 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले त्यानंतर सलग ४० वर्षे मराठी चित्रपट क्षेत्रात आणि रंगभूमीवर कारकीर्द गाजविली. सोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका साकार केल्या. जवळजवळ १२ हिंदी चित्रपटांमध्ये तर १४० मराठी चित्रपटांमध्ये काम केले.
गाजलेल्या भूमिका : 'चोरीचा मामला', 'पुढचे पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन'
गाजलेली नाटकं : 'जंगली कबुतर', 'बेबी', 'रण दोघांचे', 'सखाराम बाईंडर' आणि 'सूर्यास्त'
गाजलेली लोकनाट्य : 'कथा अकलेच्या कांद्याची', 'कुणाचा कुणाला मेळ नाही', 'पुढारी पाहिजे', 'बिन बियाचे झाड', 'मी लाडाची मैना तुमची', 'राजकारण गेलं चुलीत', 'लवंगी मिरची कोल्हापूरची' आदी
0 Comments