आपला कर कसा वाचवता येईल यासाठी प्रत्येक कर भरणारी व्यक्ती कर तज्ज्ञांकडून सल्ला घेत असतात. रिटायरमेंट नंतर आपले जीवन सुरक्षित आणि तणावमुक्त करण्यासाठी कर दात्यांना विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते. यासाठी कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता चांगला परतावा मिळेल अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. तर मग कर वाचविण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी कोणत्या योजनेत गुंतवणूक करायला हवी आणि या योजना कोणत्या आहेत. याविषयी आज आपण पाहणार आहोत... (Save income tax)
किती मिळते कर सवलत?
६० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट मिळते, तर ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा वार्षिक ५ लाख रुपये आहे.
प्राप्तिकर सवलतीसह नियमित उत्पन्नासाठी नागरिक या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणुकीचे पर्याय कोणते?
- करमुक्त रोखे : करमुक्त रोखे हे महागाईवर मात करण्याबरोबरच नियमित उत्पन्नासाठी एक चांगला पर्याय आहे एएए क्रेडिट रेटिंग असलेल्या, उच्च तरलता आणि उच्च उत्पन्न ते मॅच्युरिटी असलेल्या करमुक्त बाँडमध्ये वृद्धांनी गुंतवणूक करावी. १० वर्षांच्या रोख्यांचा सरासरी वार्षिक परतावा ८.५% आहे, जो एफडीच्या तुलनेत खूप जास्त आहे.
- टॅक्स सेव्हिंग एफडी : ज्येष्ठ नागरिक अधिक सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नासाठी ५ वर्षांच्या कर बचत एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये वार्षिक १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. परतावा करमुक्त आहे.
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ज्येष्ठ नागरिक बचत योजना सरकारतर्फे चालवली जाणारी योजना असून यात बँक अथवा पोस्टामध्ये खाते उघडले जाते. ही योजना ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजना सुरू केल्यानंतर ५ वर्षांनी रक्कम मॅच्युअर होते. त्याला आणखी ३ वर्षांनी वाढवता येते. याच्यावर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये ८० सी अंतर्गत कर सवलत मिळत. मात्र जर वार्षिक व्याज ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर टीडीएस कापला जातो.
- पीएम वय वंदन योजना : ही योजना एलआयसीला जोडण्यात आली आहे. यात भारत सरकार अनुदान देते ज्येष्ठ नागरिकांना योजनेत १० वर्षापर्यंत एका ठराविक दराने पेन्शन मिळते . पीएमव्हीव्हीवायसाठी ७.७५ टक्के व्याज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
0 Comments