इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत २०२१ च्या अखेरच्या दिवशी संपुष्टात आली. ३१ डिसेंबर पर्यंत देशभरातील सुमारे पावणेसहा कोटी करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केल्याची आकडेवारी होती. तरीही काही जणांना हि डेडलाइन पाळणे शक्य झाले नाही. त्यांनी आता काय करावे?
विहित कालावधीत रिटर्न न भरल्यास का?
- ३१ डिसेंबर पर्यंत मुदत होती.
- दिलेल्या मुदतीत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भारत आलेले नाही ते दंड भरून तो दाखल करू शकतात.
- इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम १३९ (४) अन्वये ३१ मार्च पर्यंत रिटर्न दाखल करता येऊ शकतो.
दंड किती?
- विहित कालावधीनंतर रिटर्न भरल्यास पाच हजार रुपये दंड भरावा लागतो.
- पाच लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना एक हजार रुपये दंड भरून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करता येऊ शकतो.
इन्कम टॅक्स रिटर्न का भरावे?
- आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती सरकारदरबारी देण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे योग्य ठरते.
- उत्पन्न करपात्र असो वा नसो प्रत्येक सुजाण नागरिकाने इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे आहे.
- केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेताना तसेच गृहकर्ज घेताना रिटर्न भरल्याचे दर्शवता येते.
आयटीआर भरताना हे तपासा
- ज्यांनी विहित कालावधीत इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे त्यांनी त्याची खातरजमा करून घ्यावी.
- १२० दिवसांचा कालावधी त्यासाठी देण्यात आलेला आहे.
किती जणांनी भरला आयटीआर?
- ५.८९ कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे.
- ४६.११ लाख लोकांनी ३१ डिसेंबर या एकाच दिवसात रिटर्न फाईल केले आहे.
0 Comments