महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीनं आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे.
याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.
पूर्व परीक्षा कधी होणार?
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
पदांचा तपशील
सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.
पात्रता
भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमदेवार देखील अर्ज दाखल करु शकतात. मात्र, मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक आहे. तर पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता आली पाहिजे.
1 Comments
The payout for this wager if the chosen number wins is 392 chips, in the case of a $1000 straight-up maximum, $40,000 wager, a payout of $392,000. The participant's wagered forty chips, as with all profitable bets in roulette, are still their property and in the absence of a request on the contrary are left as much as} presumably win 온라인카지노 once more on the following spin. Roulette is an intriguing and sophisticated sport of probability, and MotorCity Casino Hotel is proud to supply roulette in two versions.
ReplyDelete