About Me

header ads

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल

बाबूपेठ येथील अमृत पाणीपुरवठा योजनेचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी (Drinking water) देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका (Chandrapur Municipal Corporation) कटिबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार (Mayor Rakhi Sanjay Kanchrkawar) यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. बाबूपेठ येथील या योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा शनिवार ता. २५ सप्टेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडले.

लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. जुनोना मार्गावरील हिंग्लाज भवानी मंदिराशेजारी अमृत योजनेच्या झोन ७ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. येथील कामे पूर्ण झाली असून, नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा सुरु होणार आहे. गुरुवारी सकाळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह पदाधिकाऱयांनी या भागात नळांची पाहणी केली. त्यात पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे आढळून आले.

आज पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला नगरसेवक अनिल रामटेके, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक श्याम कणकम, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक संजय कंचर्लावार, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, जलप्रदाय विभागाचे शाखा अभियंता संजय जोगी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे आनंद भालादरे, अमित फुलझेले, श्याम सिडाम, यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments