About Me

header ads

स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन 'बी'


प्लॅन बी आपल्या आयुष्यात येऊच नये याचा नक्की विचार करावा, मात्र आलाच तरी त्यावर प्लॅन ए इतकाच जीव लावावा.
अधिकारी होण्याच्या ध्येयाने अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतात आणि जोमाने अभ्यास करायला सुरुवात करतात. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरतात. ज्या वयात मौज-मस्ती करायची असते त्या वयात हे विद्यार्थी आपले सर्वस्व पणाला लावतात. मात्र प्रत्येकालाच यश मिळतं अस नाही आणि अपयश आल्यानंतर आयुष्य थांबतं असंही नाही. म्हणून स्पर्धा परीक्षा देताना प्लॅन 'बी' असणे आवश्यक आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला यश येतं अस नाही. स्पर्धा परीक्षेतील यश हे अनिश्चित असते. मागील दीड वर्षांपासून आलेल्या कोरोना महामारीने हे वास्तव आणखीच अधोरेखित झालं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश आलं नाही तर काय करायचं, त्यानंतर कोणत्या क्षेत्राची निवड करायची याबाबतचा प्लॅन बी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असणे गरजेचं आहे.

मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास त्या काळात प्लॅन बी ठरविण्याची मुभा देत नाही. कारण अधिकारी होणं हेच त्यांच एकमेव ध्येय असते. पण चार-पाच वर्षे परीक्षा देऊन अपयश येतात तेव्हा प्लॅन बी कडे लक्ष जात. तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलेली (गुंतागुंतीची) असते. आपल्याकडे ठाम पर्याय आहेत आणि ते घेऊन आपण आयुष्य जगू शकतो याचं ते लक्षण आहे. त्यामुळे प्लॅन बी ठरवताना कोणतीही लाज किंवा खंत बाळगू नये.

जे स्वप्नी पाहिले, जे आयुष्यात ध्येय समोर ठेवले, ते रात्रंदिवस प्रयत्न करून पूर्णही केले. पण अधिकारी होवूनही बेरोजगार राहण्याची वेळ आली, म्हणून पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर (Swapnil Lonkar) या २४ वर्षीय तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरला, पण आयुष्याच्या परीक्षेत मात्र त्याला यश मिळवता आले नाही. सुमारे चार ते पाच लाख विद्यार्थ्यांमधून स्वप्निलला मिळालेले हे यश नक्कीच कौतुकास्पद होतं. पण या स्पर्धेचा चक्रव्यहू त्याला भेदता आल नाही. यशस्वी होवूनही आपल्या आयुष्याचा अशा पद्धतीने शेवट करावा लागला ही फार मोठी शोकांतिका आहे.
(खालील मजकूर बीबीसीच्या वेबसाईटवरून घेण्यात आलेला आहे)
म्हणून हे सर्व टाळण्यासाठी सकारात्मक विचार करा.
  • प्लॅन बी ठरवणं हे पराभूत मनोवृत्तीचं लक्षण आहे हा विचार आधी काढून टाका.
  • अशी काही तजवीज असणं हे प्रगल्भपणाचं लक्षण आहे.
  • कोणताही अपराधी भाव मनात बाळगू नका.
  • प्लॅन बी खणखणीत असला की प्लॅन ए पण शांत मनाने पार पाडता. न जाणो प्लॅन बी ची गरजच पडणार नाही.
  • स्पर्धा परीक्षेचं जग अनिश्चित असतं त्यामुळे अर्थाजनासाठी काहीतरी पर्याय हवा हे मनाशी निश्चित करा.
  • परीक्षेची तयारी करण्यााधीच प्लॅन बी तयार करावा. त्यासाठी स्पर्धा परीक्षा जर नसत्या तर काय केलं असतं हा विचार करा आणि त्यानुसार कामाला लागा. 
  • आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलंय त्यातच पुढे करिअर करता येईल का? किंवा आपली नैसर्गिक आवड निवड जोपासणारा व्यवसाय किंवा नोकरी करता येईल का याचाही विचार करावा.एकदा प्लॅन बी ठरवल्यावर त्याची फारशी चर्चा करू नका. त्याचवेळी प्लॅन बी चांगलाच आहे म्हणून स्पर्धा परीक्षेवरचं लक्ष उडू देऊ नका. शेवटी तो प्लॅन बी आहे हे लक्षात ठेवा.
  • नवीन परिस्थितीचा लवकरात लवकर स्वीकार करावा आणि पुढे जावं. आपण कसा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि त्यामुळे आम्हाला कसं सगळ्यातलं काकणभर जास्त समजतं हे सांगायला जाऊ नये, त्याचा काहीही फायदा नसतो.
  • असेलच ज्ञान तर ते कामातून दिसावं. आपल्या सहकाऱ्यांशी बोलतानाही सारखे सारखे स्पर्धा परीक्षांचे दाखले देऊ नये. 
  • तुम्ही पराभूत आहात ही प्रतिमा तुमच्या नकळत तयार होण्याची ती सुरुवात असते.
  • नॉस्टॅलजियात अडकू नका. नवीन वातावरणाचा स्वीकार केल्यावरही खपल्या निघतातच. मात्र आपल्याकडे जी नोकरी आहे किंवा व्यवसाय करत असाल तर त्यात कसं उत्तमोत्तम काम करता येईल याचा विचार करा.
  • एक स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून स्वप्नं पाहण्याचा अधिकार तुमच्यापासून कोणीही हिरावून घेतलेला नाही ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा.
  • आपलं अस्तित्व स्पर्धा परीक्षांमध्ये अडकून ठेवू नका. 
  • स्पर्धा परीक्षा देण्याची संधी असेल तर त्याचाही अभ्यास करावा. एखाद्या परीक्षेतलं अपयश जगण्यातला अडथळा होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावं.
  • प्लॅन ए यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न केले असतील तर प्लॅन बी अंमलात आणण्यासाठी फारसा त्रास होत नाही.
  • आपण आपल्याकडून 100 टक्के प्रयत्न केले पण नाही झाले प्रयत्न यशस्वी म्हणून हा पर्याय आहे इतका शांतपणे विचार केला की बराचसा गोंधळ कमी होतो. आपण कुठेही कमी पडलो नाही असा विश्वास उराशी असतो. आणि त्यामुळे आयुष्य अधिकाधिक सुकर होतं.

Post a Comment

0 Comments