About Me

header ads

नागपूर शहराची वाटचाल अस्वच्छतेच्या दिशेने.

मेट्रो सिटीच्या नावानी ओळखलं जाऊ लागलेलं नागपूर शहर मात्र स्वच्छतेच्या बाबतीत आणखीनच मागे जाताना दिसत आहे. शहरात जिकडे बघावं तिकडे कचरा, दुर्गंधी, खाली भूखंडावर पाणी साचून त्यांचे डबके तयार झाले आहेत. मग यास कोण कारणीभूत आहे? महानगरपालिका, नागरिक की येथे होत असलेला विकास. विकासाच्या नावाखाली आज पूर्ण नागपूर शहरात सिमेंटची रस्ते होत आहेत मात्र यामुळे शहराचे तापमान किती वाढले आहे याकडे कुणाचेच लक्ष नाही.
       मेट्रोच्या नावाखाली कितीतरी झाडांची कत्तल करण्यात आली. शहरात सार्वजनिक प्रसाधनगृहांची कमतरता, बाजाराच्या ठिकाणी सुद्धा कचरा पसरलेला दिसतो, डम्पिंग यार्ड मधील कचऱ्याचे सुद्धा वव्यवस्थापन बरोबर होत नाही, संपुर्ण नागपूर शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे असे सर्व प्रकार होत असताना कस काय आपण विचार करू शकतो की आपल्या शहर नंबर 1 बनेल.

         मागील काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलून गेले की नागपूर शहराची वाटचाल देशाच्या सर्वात सुंदर शहराच्या दिशेनं होत आहे. मात्र निकाल उलट दिशेन लागला स्वच्छतेच्या बाबतीत आणखीनच कमी गुण मिळाले. याच कारण काय असेल तर झोपडपट्टी परिसरात विकास होताना दिसत नाहीये, आठवडी बाजार पेठेच्या ठिकाणी अपुरे व्यवस्थापन, नाग नदीची झालेली अवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहाची कमतरता, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी असणारी जाणीव याची कमतरता, महानगर पालिकेचे ढिसाळ नियोजन, कचरा व्यवस्थापन समितीचा कामप्रति असलेला आळस या सर्व गोष्टीमुळे आज नागपूरची ही अवस्था झालेली आहे.
          मोदी सरकार ने स्वच्छता मोहिम सुरू केली प्रत्येक नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी यासाठी देशातील 1 कोटी लोकांना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलं. आशा मोहिमेमध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा असतो आणि लोकसहभागाशिवाय अशी उपक्रम यशस्वी सुद्धा होत नाही. मात्र नागरिक जो पर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत ही मोहीम अयशस्वीच राहील. म्हनून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव, जागृती, त्यांची जबाबदारी लक्षात आणून देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवायला हवे. जशी आपण आपल्या घराची काळजी घेतो त्याच प्रकारे आपण राहत असलेला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव प्रत्येक सुजाण नागरिकाला असायला पाहिजे तरच हे सर्व शक्य आहे. 
        आजचा नागरिक हा बेजबाबदार पणे सैरावैरा आपल्याच दुनियेत जगत आहे, त्याला कशाचीच चिंता नाही. समाजात काय चालत आहे काय नाही याबद्दल त्याला काही घेणं देणं नाही, म्हनून आज ही अवस्था झाली आहे.
           पण यापुढे अस होऊ नये यासाठी महानगर पालिकेने मोठ्या जोमाने कार्यास सुरुवात करायला पाहिजे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचे योग्य नियोजन करायला पाहिजे, पहाटे उठून झाडू मारणाऱ्या कामगारांवर नजर ठेवावी, कचऱ्याचे पुनर्वापर कसा होईल यावर संशोधन करायला पाहिजे, कचरा जमा करणाऱ्या गाड्या सातही दिवस कार्यरत असायला पाहिजे, प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, जागोजागी कचरापेट्या ठेऊन त्यावर चांगले संदेश देणारी स्लोगन लावायला पाहिजे, दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करायला हवे तसेच ते मोठे होईपर्यंत त्यांची योग्य निगा राखणे हे सुद्धा करावे लागेल. झोपडपट्टी भागात सांडपाण्याची योग्य व्यवस्था करावी, त्यांचा विकास करावा, प्लास्टिक पिशवीचा वापर कमी करण्यास लोकांना प्रोत्साहित करायला पाहिजे, तरच नागपूर स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करेल.

स्वच्छ भारत !
एक पाऊल स्वच्छतेकडे !

-अमित बोरकर

          

Post a Comment

0 Comments