घटना
१६५९ : अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे (Shivaji Raje) राजगडवरून निघून प्रतापगड (Pratap Gar) येथे पोचले.
१८०१ : फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने 'पॉन धूमकेतू'चा शोध लावला.
१८९३ : कोकिची मिकीमोटो यांनी पहिला 'कल्चर्ड मोती' (Cultured Dimond) मिळवला.
१९०८ : लोकमान्य टिळकांना (Lokmanya Tilak) मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.
१९१९ : नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.
१९३० : ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड बॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.
१९५० : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
१९५५ : अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले.
१९७१ : चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९७९ : अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.
१९९४ : पोलिस महानिरीक्षक किरण बेदी (Kiran Bedi) यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार (Ramon Magsaysay Award) मिळाला.
२००१ : आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.
२००६ : मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.
जन्म
१८८९ : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे (Narayanhari Apate) यांचा जन्म. (मृत्यू : १४ नोव्हेंबर १९७१ - कोरेगाव, जिल्हा सातारा)
१८९१ : प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे (Parshuram Krushna Gode) यांचा जन्म. (मृत्यू : २८ मे १९६१)
१९२१ : दलित साहित्यिक शंकरराव खरात (Shankarrao Kharat) यांचा जन्म. (मृत्यू : ९ एप्रिल २००१)
१९३४ : जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक जियोर्जियो अरमानी (Giorgio Armani) यांचा जन्म.
१९५३ : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Central Minister Suresh Prabhu) यांचा जन्म.
१९५६ : भारतीय - अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक अमिताव घोष (Amitav Ghosh) यांचा जन्म.
१९६७ : भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक झुम्पा लाहिरी (Short story writer Jhumpa Lahiri) यांचा जन्म.
मृत्यू
१९८९ : ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये (Sir Lawrence Olivier) यांचे निधन. (जन्म : २२ मे १९०७)
१९९४ : परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे (Major Ramrao Raghoba Rane) यांचे निधन.
२००३ : कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर (Suhas Shirvalkar) यांचे निधन. (जन्म : १५ नोव्हेंबर १९४८ )
२००९ : गीतकार शांताराम नांदगावकर (Shantaram Nandgaonkar) यांचे निधन. (जन्म : १९ ऑक्टोबर १९३६)
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन. (World Population Day)
प्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
0 Comments